MJ.NEWS.SATARA
सागर चव्हाण यांची विभागस्तरावर निवड !
जलतरण स्पर्धेत प्रथम क्रमांक !
सातारा.दि.१३.शिक्षक व अधिकारी / कर्मचारी क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरे बुद्रुक ( आंबेदरे ) ता. सातारा येथील कार्यरत पदवीधर शिक्षक श्री.सागर कृष्णत चव्हाण यांनी जलतरण स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांची विभागीय पातळीवर निवड झाली आहे.
त्यांच्या या यशाबद्दल जिल्हा शिक्षणाधिकारी श्री.अनिस नायकवडी, गटशिक्षणाधिकारी श्री रविंद्र खंदारे, शिक्षण विस्तार अधिकारी सौ. जयश्री शिंगाडे, केंद्रप्रमुख सौ. छाया कदम, जिल्हा क्रीडा समन्वयक श्री.युवराज कणसे, तालुका क्रीडा समन्वयक श्री वैभव चिखले, श्री चंद्रकांत घाडगे, श्री गणेश शिंदे, केंद्र क्रीडा समन्वयक सौ. सविता बारांगळे,मुख्याध्यापक सौ.माधवी देशमाने, सौ. माधुरी दिक्षे, सौ. रूपाली वाघ यांनी अभिनंदन केले.
