भोंदुगिरी ओळखण्याचे प्रशिक्षण आता एका क्लिक वर.! - डॉ नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठ सुरु होणार


MJ.NEWS.SATARA
भोंदुगिरी ओळखण्याचे प्रशिक्षण आता एका क्लिक वर.!
- डॉ नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठ सुरु होणार  

पुणे.दि१३ : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत सुरु करण्यात येणाऱ्या डॉ नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठाचे लोकार्पण प्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते आणि राज्य शास्त्राचे जेष्ठ अभ्यासक सुहास पळशीकर यांच्या उपस्थिती मध्ये पुणे येथील पत्रकार भवन येथे रविवार १६ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र अंनिस मार्फत मिलिंद देशमुख श्रीपाल ललवाणी,राहुल थोरात आणि हमीद दाभोलकर यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या द्वारे दिली आहे.


 या विद्यापीठातील अभ्यासक्रमांच्या मुळे वैज्ञानिक दृष्टिकोनाचे प्रशिक्षण घेतलेल्या नागरिकांना भोंदूबाबा बुवा ओळखणे आणि स्वत:ची फसवणूक थांबवणे सहज शक्य होणार आहे असे देखील या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

या विषयी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे कि,अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते सप्रयोग व्याख्यानातून सातत्याने विद्यार्थी व इतर नागरिकांसोबत अंधश्रद्धा निर्मूलनाशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधत असतात. मुलांना प्रत्यक्ष भेटून संवाद साधणे हे सर्वात प्रभावी असते परंतु त्याला मर्यादा असतात त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर  लोकविद्यापीठ या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनाशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर छोटे ऑनलाइन कोर्सेस अंनिस उपलब्ध करून देत आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा महत्वाचा भाग म्हणून सहभाग असताना असताना देखील प्रत्यक्षात शैक्षणिक अभ्यास क्रमात अनेक अवैज्ञानिक गोष्टी घुसडल्या जात आहेत. डार्विन च्या सिद्धांता सारख्या गोष्टी अभ्यासक्रमांतून वगळण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वैज्ञानिक दृष्टीकोन प्रचार प्रसार होणारे अभ्यासक्रम हे नागरिकांना सहज उपलब्ध असावेत या साठी हे अभ्यासक्रम तयार करण्यात आल्याचे या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
पुढच्या दुसऱ्या टप्प्यात फलज्योतिष फोलपणा , मानसिक आरोग्य अशा स्वरूपाचे कोर्स देखील सुरु केले जाणार आहेत  

सुरुवातीला या प्लॅटफॉर्मवर पुढील सहा कोर्सेस उपलब्ध असतील.  
   1.वैज्ञानिक दृष्टिकोन 
2. अंगात येणे 
3. भुताने झपाटणे 
4. भ्रामक वास्तुशास्त्र 
   5. छद्म विज्ञान 
6. व्यसनमुक्ती
तेरा वर्षांवरील मुलांपासून पुढे कोणताही नागरिक हे कोर्सेस करू शकेल. ऑनलाइन परीक्षा दिल्यानंतर प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांच्या सहीचे एक आकर्षक प्रमाणपत्र मिळेल. परीक्षेतील प्रश्न देखील केवळ माहिती नाही तर आकलन तपासणारे आहेत. 

www.anisvidya.org.in वेबसाईटवर जाऊन आपली नोंदणी करून अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. सर्व अभ्यासक्रम आणि परीक्षा नि:शुल्क आहेत अशी माहिती देखील या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

Post a Comment

एम.जे.न्युज ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!

Previous Post Next Post