शेतकऱ्यांनी कृषि समृद्धी योजनेचा लाभ घ्यावा : तालुका कृषि अधिकारी डॉ.अमरज्योती गच्चे


MJ.NEWS.SATARA
शेतकऱ्यांनी कृषि समृद्धी योजनेचा लाभ घ्यावा :  तालुका कृषि अधिकारी डॉ.अमरज्योती गच्चे

एम.जे.न्युज-सातारा- प्रतिनिधी- वसंत सिरसाट

नांदेड :दि14- वातावरणातील सततच्या बदलामुळे येणाऱ्या विविध आपत्तींना तोंड देऊन शेतकऱ्यांना सक्षम बनविणारी तसेच उत्पादनातील होणारी घट लक्षात घेऊन शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी कृषी समृद्धी योजना सन 2025 26 या नाविन्यपूर्ण योजनेचा मुदखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी डॉ.अमरज्योती गच्चे यांनी केले आहे. कृषि समृद्धी योजनेमध्ये नाविन्यपूर्ण विविध बाबींचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये (1) किसान ड्रोन योजनेचे मुदखेड तालुक्यास 1 लक्षांक असून किंमतीच्या 50% किंवा 5 लाख रुपये अनुदान, (2)जैविक निविष्ठा संसाधन केंद्र (बीआरसी) स्थापन करणेचे 2 लक्षांक असून किंमतीच्या 75% किंवा 1 लाख (शेतकरी गट) व 5 लाख (शेतकरी उत्पादक कंपनी)अनुदान, (3)काढणी पश्चात शेतमाल थेट विक्री साठी फिरते वाहन विक्री केंद्र सुविधा योजनेचे किंमतीच्या 50% किंवा 7 लाख रुपये अनुदान, (4)जिल्ह्यातील शेतकरी प्रशिक्षण केंद्रांचे बळकटीकरण योजनेचे 3 लक्षांक असून 100% 26.50 लाख अनुदान, (5)पीक प्रात्यक्षिका अंतर्गत चिया सीड्स प्रकल्प योजनेचे 40 हेक्टर लक्षांक असून 8500/- रुपये प्रति हेक्टर 100% अनुदान, (6)पीक प्रात्यक्षिका अंतर्गत मका प्रकल्प योजनेचे 10 लक्षांक असून 15000/- प्रति हेक्टर अनुदान, (7)कॉटन श्रेडर योजनेचे 8 लक्षांक असून किंमतीच्या 50% अनुदान, (8)क्रॉप रिपर (सोयाबीन कापणी यंत्र) 7 लक्षांक असून किंमतीच्या 50% अनुदान, (9)स्पायरल सेपरेटर योजनेचे 135 लक्षांक असून 6.07 लाख 4500/प्रति रुपये किंवा किंमतीच्या 50% अनुदान या बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे.
तेव्हा इच्छुक शेतकऱ्यांनी सहाय्यक कृषि अधिकारी, उप कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचेकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन मुदखेड तालुका कृषि अधिकारी डॉ. अमरज्योती गच्चे यांनी केले आहे. ही योजना ऑफलाईन पद्धतीने अर्ज घेऊन DBT तत्वावर राबविण्यात येणार आहे. लक्षांका पेक्षा जास्त अर्ज आल्यास लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येईल. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी तात्काळ सहायक कृषी अधिकारी यांच्याकडे कागदपत्रसह अर्ज भरून द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

एम.जे.न्युज ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!

Previous Post Next Post