उस्माननगर पोलीस ठाण्याची अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई : पंधरा लाख पंधरा हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त.....


MJ.NEWS.SATARA
उस्माननगर पोलीस ठाण्याची अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई : पंधरा लाख पंधरा हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त.....

एम.जे.न्युज सातारा- प्रतिनिधी- वसंत सिरसाट(उमरा)

नांदेड : दि.9, उस्माननगर पोलीस ठाणे अंतर्गत कौठा फाटा ते धनंज रोडवर अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करत रुपये 15,15,000 (पंधरा लाख पंधरा हजार रूपयांचा) मुद्देमाल जप्त करत सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार गंगाधर चिंचोरे, माधव पवार, तुकाराम जुने, प्रकाश पेद्येवाड यांनी ही मोठी कारवाई करण्यात आली. 

दि.9 नोव्हेंबर 2025 रोजी कौठा फाटा ते धनंज रोडवर एक लाल रंगाचा टिपर  क्रमांक ( एम.एच.26- ए.डी. 8411) हा अवैध वाळू घेऊन जात असल्याचे ऑपरेशन फ्लशआऊट अंतर्गत माहिती मिळाली, या गुपित्त माहितीनुसार अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिपरवर छापा टाकून चालक मुरलीधर प्रकाश ढगे - वय 28 वर्ष रा.येळी, ता.लोहा. यास ताब्यात घेण्यात आले असता आरोपीकडे अनुमती नाही, तसेच त्याच्याकडून 3 ब्रास गौण खनिज वाळू आणि टिप्पर जप्त करण्यात आला आहे. 
या प्रकरणी उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा नं 268/2025 कलम 303 (2) BNS व 4.21 खान व खनिज अधिनियम 1957 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक- अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक- श्रीमती अर्चना पाटील व सुरज गुरव, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी- डॉ.अश्विनी जगताप यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सपोनि संजय निलपत्रेवार व त्यांच्या पथकाचे पोलीस अधीक्षक नांदेड यांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले आहे.

Post a Comment

एम.जे.न्युज ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!

Previous Post Next Post