MJ.NEWS.SATARA
मलकापूर नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी सुनंदा साठे
तर नगरसेवक पदासाठी 15 उमेदवारी अर्ज दाखल
हेमंत पाटील ( कराड)
कराड.दि.१३.भाजपकडून नगराध्यक्षपदाचा एक आणि नगरसेवक पदांसाठी एकूण १३ उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केले. यामध्ये माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यासह अनेक अनुभवी चेहऱ्यांचा समावेश आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कडून एक, तसेच नितीन उर्फ नारायण विष्णुपंत काशीद पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्ग आरक्षित नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून सुनंदा तानाजी साठे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज दाखल झालेल्या इतर उमेदवारी अर्जांची यादी पुढीलप्रमाणे —
प्रभाग ११ : मधून मनोहर भास्करराव शिंदे, राजश्री नितीन जगताप
प्रभाग १० : मधून वसीम शब्बीर मुल्ला (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
प्रभाग ८ :मधून गीता नंदकुमार साठे (अनुसूचित जाती प्रवर्ग)
प्रभाग ७ :मधून संभाजी मारुती रैनाक
प्रभाग ५ : मधून तानाजी संभाजीराव देशमुख, राजेंद्र प्रल्हाद यादव
प्रभाग ४ :मधून कल्पना नारायण रैनाक, सचिन संपत खैरे (अनुसूचित जाती प्रवर्ग)
प्रभाग ३ : मधून रंजना अशोक पाचुंदकर
प्रभाग २ : मधून गीतांजली शहाजी पाटील, विक्रम अशोक चव्हाण
प्रभाग १ : मधून शहाजी आनंदराव पाटील
तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कडून —
प्रभाग ५ :मधून मधुकर महादेव शेलार यांनी
तर अपक्ष उमेदवार म्हणून —
प्रभाग १ : मधून नितीन उर्फ नारायण विष्णुपंत काशीद पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे,
अशी माहिती मलकापूर नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कल्पना ढवळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कपिल जगताप व सहाय्यक ज्ञानदेव साळुंखे यांच्याकडून देण्यात आली.
दरम्यान, नगराध्यक्षपद आणि नगरसेवकपदासाठी झालेल्या या अर्जभरणीमुळे मलकापूर नगरपरिषद निवडणुकीची रंगत अधिकच वाढली आहे.
