MJ.NEWS.SATARA
आररर शेतकऱ्याचा नादच खुळा! शेतीकामासाठी घेतली सवालाखांची खिल्लारीजोडी
क्षेत्र कुसुंबी.दि.९.शेतीचे यांत्रिकरण झाल्याने बहुतांश कामे बैलांऐवजी ट्रॅक्टर व अन्य यंत्राद्वारे केली जातात. बैल सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही कमी होत आहे. असे असले तरी बैलांवर प्रेम करणारे हौशी शेतकरी कमी नाहीत. शेतातील कामासाठी व खास दावणीला खिलार जोड असावी असे मानणारे शेतकरीही आहेत. कुसुंबीधील बैलप्रेमी पांडुरंग वेंदे यांच्या परिवाराने यावर्षी शेतीकामासाठी सुमारे सवा लाखांची सुंदर खिलार जातीची बैलजोडी खरेदी केली आहे. सजवून- धजवून ही जोडी घरी आणण्यात आली त्यांची ओवाळून पुजा करण्यात.
सातफुटी सुंदर बैलजोडी असुन त्यांनी सुमारे सवालाख रुपयांना खरेदी केली आहे. तालुक्यातील ही सर्वात मोठी, सुंदर व सुबक बैल जोडी असल्याचा दावा वेंदे परिवाराने केला आहे. म्हातेमुरा येथील प्रगतशील शेतकरी व व्यापारी सुरेश गोरे यांच्याकडून पांडुरंग वेंदे यांनी ही सर्जा-राजाची जोडी विकत घेतली. सजवून-धजवून ही जोडी त्यांनी घरी आणली आहे. साधु वेंदे, संजय वेंदे,नामदेव वेंदे,गोरख वेंदे उपस्थित होते.

