जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श केंद्र शाळा मेढा येथील शिक्षकांचे कार्य कौतुकास्पद... अभिजीत शिंगटे


MJ.NEWS.SATARA
जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श केंद्र शाळा मेढा येथील शिक्षकांचे कार्य कौतुकास्पद... अभिजीत शिंगटे

मेढा.दि१३/सुधाकर दुंदळे...
मानवी जीवनात गुरुचे स्थान महत्वाचे आहे. मुलांना योग्य वयात संस्कार आणि शिक्षण देताना मुलांवर होणारा परिणाम त्यांचे भविष्य घडविते आणि हेच कार्य शिक्षकांनी केले असून जिल्हा परिषद प्राथामिक आदर्श केंद्र शाळा मेढा येथील शिक्षकांचे कार्य कौतुकास्पद आहे. असे उद्‌गार शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अभिजीत शिंगटे यांनी काढले.
         सध्या शासन निर्णयानुसार अनेक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या झालेल्या आहेत. मेढा येथील भैरवनाथ मंदिर येथे आयोजीत शिक्षक निरोप समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.  या वेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अभिजीत जवळ, गणेश वंजारी, सुनिल कांबळे, संदिप पवार, सागर करंजेकर, सुभाष जवळ, सादिक सय्यद, प्रमोद फल्ले, महिला सदस्या मनिषा सपकाळ, श्रद्धा निकम, स्वाती नाईकनवरे, आरती हिरवे, दिपाली जवळ, मेघना पिलके, उषा चिकणे आदि मान्यवर उपस्थित होते.
     या वेळी आदर्श केंद्र शाळा मेढा येथील सौ. योगिता मापारी , सौ पूनम कदम, सौ अनुपमा दाभाडे, सौ शिल्पा कारंजकर, सौ माधुरी कदम मॅडम यांची बदली झालेने निरोप समारंभाचे आयोजन मुख्याध्यापिका सौ रंजना सपकाळ आणि सर्व शिक्षक, शिक्षिका सहकारी यांचे वतीने उत्तम रित्या करण्यात आले होते. 
     कार्यकमाचे प्रस्ताविक श्रीमती शिल्पा फरांदे यांनी केले , श्री समीर आगलावे, विनायक करंजेकर, सौ कदम, सौ. मापारी,कारंजकर मॅडम यांनी आपली मनोगते व्यक्त केली . 
      या कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी अश्रू युक्त नयनांनी आपले मनोगत व्यक्त केले. बाल चमुंना आपल्या शिक्षकांना निरोप व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देताना गहिवरून आले होते. ओठावर हास्य आणि डोळ्यात पाणी अशा भावविक क्षणाने उपस्थित पालकांचेही मन भरून आले होते.            या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिल्पा फरांदे मॅडम यांनी केले व आभार मेढा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रंजना सपकाळ मॅडम यांनी केले.

Post a Comment

एम.जे.न्युज ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!

Previous Post Next Post