MJ.NEWS.SATARA
शेतकऱ्यांनी कृषी समृद्धी योजनेचा लाभ घ्यावा : लोहा तालुका कृषी अधिकारी - प्रशांत कासराळे
एम.जे.न्युज सातारा- प्रतिनिधी- वसंत सिरसाट
नांदेडदि१५ : कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढविणे, पायाभूत सुविधा निर्माण करणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढविणे, पिकांचे विविधीकरण करणे, मूल्यसाखळी बळकट करणे तसेच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्या साठी कृषि समृद्धी योजना सन
2025 -26 या वर्षासाठी जिल्ह्यात
राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना विविध घटकांचा लाभ घेता येणार आहे. इच्छुकांनी आपले अर्ज दि.18 नोव्हेंबर 2025 पर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन लोहा तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे यांनी केले आहे.
चिया पीक प्रात्यक्षिक आणि मका पीक प्रात्यक्षिक या घटकांसाठी "पहले आओ, पहले पाओ" या तत्त्वावर लाभ देण्यात येणार असून, इतर घटकांसाठी लॉटरी पद्धतीने सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी विलंब न करता अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी,
तसेच या योजनेंतर्गत भांडवली गुंतवणुकीला चालना देऊन कृषी उत्पादन क्षमता वाढविणे, शाश्वत शेतीला बळ देणे व ग्रामीण अर्थ व्यवस्थेत स्थैर्य निर्माण करणे हा प्रमुख उद्देश या योजनेत आहे.
तसेच योजनेंतर्गत आवश्यक मार्गदर्शन, अनुदान आणि प्रात्यक्षिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे पूर्ण भरून सादर करावीत. कोणत्याही प्रकारची अडचण किंवा शंका असल्यास आपल्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे यांनी केले आहे.
