MJ.NEWS.SATARA
आज कराड नगरपरिषद निवडणुकी साठी नगराध्यक्ष पदासाठी एकही अर्ज नाही
नगरसेवक पदासाठी भाजपा कडून 9 अर्ज दाखल
कराड.दि.१५.( हेमंत पाटील)कराड नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी भाजपाकडून नगरसेवक पदासाठी 9 तर लोकशाही आघाडी कडून 2 व अपक्ष 3 जणांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये प्रभाग 3 मधून पवार ज्योती अधिकराव (अपक्ष), प्रभाग 4 मधून मोहिते स्वाती रमेश (भाजप), प्रभाग 4 मध्ये रामुगडे शिवाजी कांतीसुरत (भाजप), प्रभाग 7 मध्ये कुलकर्णी अजय अरविंद (अपक्ष), प्रभाग 8 मध्ये विभूते विनायक शिवलिंग (भाजप), प्रभाग 9 मध्ये साळुंखे विद्याराणी घनश्याम (लोकशाही आघाडी कराड शहर), प्रभाग 9 मध्ये साळुंखे प्रताप घनश्याम (लोकशाही आघाडी कराड शहर), प्रभाग 10 मध्ये भोपते विक्रम राजाराम (भाजप), प्रभाग 11 मध्ये रैनाक प्रसाद नरेंद्र (भाजप), प्रभाग 13 मध्ये हूलवान स्मिता रवींद्र (भाजप), प्रभाग 13 मध्ये शाह निखिल प्रमोद व शाह गिरीश बाबूलाल (भाजप), प्रभाग 14 भोंगाळे प्रियांका दत्तात्रेय (अपक्ष), प्रभाग 14 मधून पवार महादेव बळवंत (भाजप) आदींनी आपले उमेदवारी अर्ज आज दाखल केले.
अशी माहिती कराड नगर परिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली. सर्व उमेदवारांनी नामनिर्देशन अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांसह आपले उमेदवारी अर्ज कराड नगरपरिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे सादर केले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत व्हटकर उपस्थित होते.
रविवार सुट्टीचा दिवस वगळता १७ नोव्हेंबरपर्यंत सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत आहे.
