MJ.NEWS.SATARA
वाका येथील श्री वाजेश्वर बाबांच्या यात्रा महोत्सवास प्रारंभ.....
एम.जे.न्युज सातारा- प्रतिनिधी- वसंत सिरसाट
नांदेड : दि.9- लोहा तालुक्यातील वाका येथील चारशे वर्षांची परंपरा असलेल्या श्री वाजेश्वर यात्रा महोत्सवास दि.9 नोव्हेंबर 2025 पासून प्रारंभ होत आहे. या दिवशी सकाळी श्री बाबांच्या महास्थानावर मंगलस्नान, विडा, अवसर, उपहार व महाआरती विधिवत पूजाअर्चा आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. रात्री 9:00 वाजता गावातील मुख्य रस्त्याने ढोल- ताशांच्या गजरात बँड पथक, भजन- आरती पारंपरिक मशाली हातात घेऊन टिपरे- बताशांची उधळण करत महाविशेषांच्या पालखीतून मिरवणूक निघणार आहे. या नंतर रात्री महाराष्ट्राच्या लोककलेची परंपरा असलेल्या बहारदार लावणीचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. दि.10 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:00 वाजता पारंपरिक दहिहंडी उत्सव संपन्न होणार आहे. तर दुपारी 2:00 वाजता जंगी कुस्ती फडाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन वाका ग्रामस्थांनी केले आहे.
