नांदेडच्या भडके कॉम्प्युटरचे संचालक सुनील भडके यांनी दिली "एआय" टूलची माहिती.
एम.जे.न्युज सातारा /राजू पवार जिल्हा प्रतिनिधी
नांदेड: दि.11.गेल्या दशकापासून MS-CIT माहिती तंत्रज्ञान (IT) साक्षरता क्षेत्रात ज्ञानदान करणाऱ्या भडके कॉम्प्युटर शारदा नगर नांदेड या नामांकित संगणक केंद्रात MS-CIT प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमात "एआय" टूल्स समाविष्ट करून पुन्हा नव्याने MS-CIT च्या अभ्यासक्रमात अधिकचे भर टाकण्यात आल्याची माहिती भडके कॉम्प्युटरचे संचालक सुनील भडके यांनी दिली आहे.
शासन मान्य कॉम्प्युटर कोर्स म्हणून MS-CIT हा माहिती तंत्रज्ञान (IT) साक्षरता अभ्यासक्रम आहे, जो MKCL ने 2001 मध्ये सुरू केला. हा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय IT साक्षरता अभ्यासक्रम आहे, जो शिकणाऱ्यांना महत्वपूर्ण डिजिटल कौशल्ये विकसित करण्यास मदत करतो. कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence - AI) च्या वाढत्या वापरामुळे तंत्रज्ञान हे वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. या बदलाची जाणीव ठेवून, MS-CIT आता आपल्या अभ्यासक्रमात AI टूल्स समाविष्ट करत आहे, ज्यामुळे शिकणाऱ्यांना AI-सक्षम उत्पादकता, अभ्यास, नोकरीसाठी तयारी आणि व्यवसाय व्यवस्थापनाचे कौशल्य विकसित करण्यास मदत होते. "एआय" आणि डिजिटल साक्षरता यांचा संपूर्ण समावेश करून, MS-CIT हे सुनिश्चित करते की शिकणारे भविष्यासाठी सज्ज, स्पर्धात्मक आणि डिजिटल युगाशी जुळवून घेणारे होतील. "एआय" टूल म्हणजे नेमके काय याबाबत सुनील भडके यांनी सविस्तर माहिती दिली आहे. ते म्हणाले की, एआय ही जगभरात प्रसिद्ध असलेली टेक्नॉलॉजी आहे. "एआय" म्हणजे मानवी बुद्धिमत्तेसारखे शिकण्याची क्षमता मशीन्समध्ये आणि त्या मशीनमधल्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्समध्ये तयार करण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान. आर्टिफिशियल इंटेलिजन्सला मराठीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा अनेक क्षेत्रात वापर होत आहे. डिजिटल गोष्टीमध्ये एआयचा खूप फायदा होऊ शकतो. जसे की स्मार्टफोन्स, ऑनलाईन बँकिंग व्यवहार, ऑनलाईन डेटा, फाईल्स सुरक्षित राहू शकतात. कोणीही यांना हॅक किंवा एक्सेस करु शकणार नाही. त्यामुळे गोपनीयता धोरण पाळले जाईल. अन्य विविध ठिकाणी या टूल चा उपयोग म्हणजे वाहतूक: स्वयं-ड्रायव्हिंग कार विकसित करण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यासाठी एआयचा वापर केला जातो, ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि उर्जेची मागणी अंदाज घेण्यासाठी, सार्वजनिक सुरक्षा सुधारण्यासाठी, गुन्हेगारी शोधण्यासाठी आणि नागरिक सेवा प्रदान करण्यासाठी एआयचा वापर केला जातो. एआय साधनांचा वापर करून विविध क्षेत्रांत सध्या काम होत आहे. हा टूल MS-CIT अभ्यास क्रमात शिकवीला जाणार असल्याने स्वयंचलित कार्य, बिझनेस ऑपरेशन्स आणि निर्णयक्षमता सुधारणे, कामाचा वेग वाढवणे, वर्तनाचा अंदाज लावणं आणि महसूल वाढवणं इत्यादींसह इतर गोष्टींसाठी बिझनेसमध्ये विद्यार्थी, डेव्हलपर किंवा फक्त तुमच्या कौशल्यांना चालना देऊ इच्छित असाल तरीदेखील फायद्याची ठरू शकणार असल्याचे सुनील भडके म्हणाले. तसेच माहिती तंत्रज्ञानाच्या काळात MS-CIT सोबत विविध उच्च दर्जाचे कोर्सेस शिकण्यासाठी आमच्या शारदा नगर नांदेड येथील भडके कॉम्प्युटर प्रशिक्षण केंद्रात आपला प्रवेश नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले आहे.