बामणोली विभागातील अंधारी गावात सुवर्णमोहस्तवाची जयंत तयारी.

बामणोली विभागातील अंधारी गावात सुवर्णमोहस्तवाची जयंत तयारी.

एम.जे.न्युज. सातारा.

बामनोली.दि.13.कोयना पूर्ण बामणोली विभागातील १०५ गाव समाजातील अंधारी गावात सालाबादप्रमाणे या वर्षी आई कासाई देवीच्या आशीर्वादाने आणि संत महापुरुष याच्या कृपेने अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा उद्या पासून सुरू होत असून हे या सोहळ्याचे ५० वे वर्ष आर्थात सुवर्णमोहत्सवी वर्ष असून या निमित्ताने ग्रामस्थ मंडळ अंधारी,मुंबईकर मंडळी,तरुण वर्ग आणि माता भगिनी यांच्या सर्वांच्या अथक प्रयत्नांनी या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून उद्या पासून या सोहळ्याची सुरुवात होत आहे.या सोहळ्याच्या दरम्यान जणू काय अंधारी गावात पंढरीच अवतरणार आहे..कारण महाराष्ट्रातील आध्यात्मिक क्षेत्रातील नामवंत कीर्तनकार.. प्रवचनकार..या सोहळ्याला उपस्थित राहून आध्यातमाची महती आणि ताकत काय आहे हे सांगण्याचा आणि समाज परिवर्तन करण्याच्या प्रयत्न ही सर्व दिग्गज मंडळी करणार असून..सकाळी काकड आरती..त्यानंतर ज्ञानेश्वरी वाचन...मग प्रवचन...संध्याकाळी माऊलीचा हरिपाठ...आणि रात्री हरी किर्तन ..व त्यानंतर जागरण म्हणून संगीत भजनाचा कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रम उद्यापासून ५ दिवस अंधारी गावात भाविकांसाठी आयोजित केले आहेत याच दरम्यान येणाऱ्या सर्व भाविक सज्जनासाठी दात्यान कडून अन्नदान सेवा महाप्रसाद याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती अंधारी गावचे सरपंच पो.पाटील यांनी दिली तर भागातील सर्व जेष्ठ वरिष्ठ सर्व कार्य क्षेत्रातील मान्यवर उद्योजक आणि पत्रकार बांधव यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवावी असे जाहीर आव्हान देखील केले.

Post a Comment

एम.जे.न्युज ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!

Previous Post Next Post