आरोग्य अधिकारी ते सामाजिक कार्यकर्त्या प्रवास करणाऱ्या डॉक्टर निकिता सोनावले यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा.
एम.जे.न्युज.सातारा कराड प्रतिनिधी राहुल पवार.
कराड.दि.9. आज मानवाच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा आहेत त्या मिळवण्यासाठी प्रत्येक जण धडपडत आहे मनुष्य हा निसर्ग साखळीतील कृतीशील प्राणी आहे खरंतर मानव जात निर्माण झाली त्यापासून त्याच्या आरोग्याच्या साठी सुविधाची गरज निर्माण झाली या आरोग्य सेवेसाठी आपण कार्यरत असावं प्रत्येक जण प्रयत्न करतो काहीजणांना यश मिळतं काही जणांना अपयश मिळते मग पर्यायाने दुसऱ्या क्षेत्रात जावं लागतं परंतु आपण वैद्यकीय क्षेत्रातच जायचं मनाशी निश्चय धरून लहानपणापासूनच या क्षेत्रासाठी जिद्द कष्ट आत्मविश्वास याच्या जोरावर कोरेगाव तालुक्यातील.
पिंपरी सारख्या छोट्या गावात जन्माला आली. पिंपरी सारख्या ग्रामीण भागात कोणत्याही क्लास व स्पर्धा मार्गदर्शन केंद्र नसतानाही तिने प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत हे यश मिळवले आहे.छोट्याशा कुटुंबात जन्माला आलेली निकिता जगन्नाथ सोनावले हिने प्राथमिक शिक्षण रहिमतपूर वसंतराव दादा पाटील विद्यालय रहिमतपूर कराड येथे घेतले वैद्यकीय शिक्षण शारदा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज यादगिरी कर्नाटक येथे घेतले सामाजिक व पर्यावरण क्षेत्रामध्ये शालेय जीवनापासूनच तिला आवड होती वडील जगन्नाथ सोनावले हे सांगतात आपण समाजाचे काहीतरी देणे घेणे लागतो या उद्देशाने प्रत्येकाने समाजासाठी काहीतरी करावे निकिता किशोरवयीन मुलांसाठी आरोग्य सामाजिक ज्ञान याचे धडे देते वैद्य सेवेबरोबर मुलांमध्ये सोशल मीडिया व त्यापासून दुष्परिणाम याविषयी प्रबोधन सातत्याने करत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलांच्या मानसिकतेवरती परिणाम होत आहे प्राथमिक उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातून वैद्यकीय सेवा तत्पर देण्यासाठी सदैव मी कार्यरत असते अभिमानाची गोष्ट म्हणजे वैद्यकीय सेवा ग्रामीण भागातच देण्याची संधी तिला मिळाली तिचा तिला सार्थ अभिमान आहे वाठार आरोग्य वाठार लगत ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या मोठी असते.ग्रामीण भागातील गरजू रुग्णाची संख्या या प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठी आहे.ग्रामीण भागातून शालेय जीवन व माझा प्रवास आहे त्यामुळे तेथील आरोग्याच्या समस्या मला माहित आहेत त्या समस्येसाठी वैद्य सेवेतून मदत करण्यासाठी तत्पर राहील असे या रीतीने सांगितले किशोरवयीन मुलांसाठी आरोग्य मनन चिंतन प्रक्रिया याविषयी सातत्याने वाठार परिसरातील शाळा महाविद्यालयामध्ये प्रबोधन करणार आहे भविष्यामध्ये प्रत्येक समुदेशन देण्यासाठी प्रयत्न करणार आहे विशेष मासिक पाळीसाठी प्रबोधन व विविध उपक्रम घेण्यासाठी भविष्यात कार्यरत राहू माझ्या वाढदिवस हा आरोग्य सेवेच्या साठी व परिसरातील मुलांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रमांनी साजरा केला जातो यासाठी माझा मित्र परिवार व माझे सहकारी याचे मला यांचे मला मुलाचे सहकार्य असते असे यावेळी निकिता सोनवले यांनी सांगितले त्यांच्या वाढदिवसा दिवशी गरजू मुलांना खाऊ वाटप व भेटवस्तू दिल्या जातात विशेष करून उन्हाची तीव्रता ओळखून रस्त्यावरती फिरणाऱ्या गोरगरीब लोकांना चप्पल वाटप केले जात आहे या उपक्रमाचे कौतुक परिसरातील नागरिक करत आहेत.